सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत करावी : उद्धव ठाकरे

Foto
सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत करावी : उद्धव ठाकरे
पैठण, (प्रतिनिधी) : मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीने संकटात असून शेतकऱ्यांचे अश्रू वाया जाणार नाही, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत करावी. पंतप्रधान मोदी यांनी पीएम केअरसाठी लाखो करोड रुपये जमा केले आहे. पीएम केअर फंडामधून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजार मदत करा नसता मराठवाड्यातिल शेतकऱ्यांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशाराही उद्धव ठाकरे दिला आहे. गुरुवारी त्यांनी तालुक्यातील रजापूर येथील शेतकरी प्रल्हाद काळे यांच्या शेती मध्ये रात्री ८ वाजता दाखल झाले यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

या प्रसंगी संजय राऊत, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, सचिन घायाळ, दत्तात्रय गोर्डे, डॉ सुनील शिंदे सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काळे या शेतकऱ्यांच्या अडीच एकर शेती मधील सोयाबीन व तुती, गणपत काळे उस उत्पादक या शेतकऱ्यांशी संवाद साधला. याअगोदर ठाकरे यांनी येथील  बिहारमध्ये निवडणूका आहेत, म्हणून मोदी तिकडे महिलांच्या खात्यावर दहा हजार रुपये टाकतात. महाराष्ट्रात दीड हजार देतात हा भेदभाव कशासाठी हे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगावे.
सध्या मराठवाडा व महाराष्ट्र अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय आपत्ती आहे. आम्ही राजकारण करत नाही. कर्जमुक्त करा, तात्काळ ५० हजार द्या, उपकार करत नाही कर्जमुक्त केले नाही, 

 शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पैठण तालुक्यातील रजापूरमध्ये काल रात्री ८ वाजता दाखल झाले. थेट शेतकऱ्यांना धीर देत त्यांच्यासोबत संवाद साधला. माझ्या हातात काही नसले तरी, तुम्हाला साथ देण्यासाठी आलो आहे. कोणीही खचू नका. आणि वेडेवाकडे पाऊल उचलू नका, असे भावनिक आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी शिवसेनेचे आप्पासाहेब गायकवाड, आनंद भालेकर, शुभम पिवळ, संजय कोरडे, ज्ञानेश्वर शिंदे कांतिलाल गांगवे, राम पवार, भाऊसाहेब पिसे, कल्याण मगरे सह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
आत्महत्या करु नका. आम्ही तुमच्या बरोबर आहोत असे आवाहन ठाकरे यांनी केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी रहाटगाव येथील मेंढ्या वाहून गेलेल्या दोन शेतकऱ्यांना तात्काळ एक लाखाची मदत दिली. 

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. त्यांना धिर इतरांनी द्यावा असे आवाहन केले. अजित पवारांवर टिका करताना ते लाडक्या बहिणीना दीड हजार देऊन उपकार करत नाही, दीड हजार भावाचा संसार चालतो का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नुसते दौरे करत फिरू नका शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या असे, या वेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.